नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. व्याकरणिक विशेष: { संबंध- प्रथम आणि द्वितिय पुरुष एकवचन}
वाक्यातील दोन नामांमधील संबंधकारक दर्शविण्याकरिता षष्ठी विभक्तीचा उपयोग केला जातो. उदा. ‘हे माझं /तुझं घर आहे’ या प्रमाण मराठीतील वाक्यात [-झ़-] हा प्रथम पुरुष आणि द्वितिय पुरुष एकवचन विभक्ती प्रत्यय ‘मी/ तू’ आणि ‘घर’ या नामांमधील संबंध दर्शवितो.
१.0 व्याकरणिक विशेषाची नोंदसर्वेक्षणातून संबंधवाचक प्रथम पुरुष आणि द्वितिय पुरुष एकवचन विभक्ती प्रत्ययाची मराठीच्या बोलींमध्ये चार पर्यायी रूपे मिळाली : (१) [-ज़/झ़/ज/झ-]; (२) [ नामाचे सामान्य रूप]; (३) [-ल-]; (४) [-न-]. या पर्यायी रूपांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.
१.१ पर्यायी रूप १ : [-ज़/झ़/ज/झ-] संबंध-प्र.द्वि.पु.ए.व. प्रत्ययाचे [-ज़/झ़/ज/झ-] हे रूप राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सापडले. १.१.१उदाहरण (जि. लातूर, ता. लातूर, गाव तांदुळजा, पु४५, मांग, १२वी) माझे सद्याचे छंद काय नाही Maǰʰe sədyače čʰənd kay nahi ma-ǰʰ-e sədya-č-e čʰənd kay nahi I.OBL-GEN-3PL current-GEN-3PL hobby.PL what NEG Currently I don’t have any hobbies. १.२ पर्यायी रूप २ : [नामाचे सामान्य रूप]मराठीच्या काही प्रादेशिक बोलींमध्ये संबंध-प्र.द्वि.पु.ए.व. हा व्याकरणिक विशेष दर्शविण्यासाठी स्वतंत्र विभक्ती प्रत्यय आढळला नसून नामाचे सामान्य रूप हेच संबंध-प्र.द्वि.पु.ए.व. हा कारक संबंध दर्शविते. पुढे येणार्या नामाच्या लिंगानुसार सामान्य रूपाला लागून येणारा स्वर (अ/आ/इ/ओ) बदलतो. हा पर्याय राज्यातील २६ जिल्ह्यांत आढळला. या पर्यायाचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
चंद्रपूर | चंद्रपूर - चकनिंबाळा व दाताळा, राजुरा - कढोली (बुद्रुक) व कोष्टाळा, ब्रह्मपुरी - तोरगाव (बुद्रुक) |
गडचिरोली | गडचिरोली - खुर्सा व शिवणी |
गोंदिया | गोंदिया - तेढवा |
भंडारा | भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी |
नागपूर | नागपूर - येरला व सोनेगाव (लोधी), भिवापूर - बोटेझरी, रामटेक - करवाही व भोजापूर, नरखेड - उमरी व पांढरी |
वर्धा | आष्टी - खडका व थार, सेलू - वडगाव जंगली |
यवतमाळ | घाटंजी - खापरी व कुर्ली, नेर - कोलुरा व दगड धानोरा |
अमरावती | अमरावती - मलकापूर, दर्यापूर - भांबोरा, जितापूर व भामोद, धारणी - कावडाझिरी |
अकोला | अकोला - येवता |
वाशिम | वाशिम - शिरपूटी, रिसोड - घोणसर, कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक) |
बुलढाणा | बुलढाणा - पळसखेड भट व वरवंड, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ |
हिंगोली | हिंगोली - कारवाडी |
नांदेड | नांदेड - लिंबगाव व पांगरी, किनवट - मारेगाव (खालचे), देगलूर - रमतापूर |
परभणी | पालम - कापसी, सोनपेठ - तिवठणा, परभणी - टाकळगव्हाण |
बीड | बीड - बेडूकवाडी |
जालना | जालना - धावेडी, मंठा - उसवद व तळणी |
औरंगाबाद | औरंगाबाद - पिंपळखुंटा, पैठण - पाचोड (बुद्रुक), सोयगाव - घोसला व पळसखेडा |
अहमदनगर | अकोले - ब्राह्मणवाडा व डोंगरगाव, नेवासा - खलालपिंपरी व मोरगव्हाण, अहमदनगर - कामरगाव व नारायण डोहो, जामखेड - सावरगाव |
पुणे | हवेली - केसनंद, जुन्नर - बोरी (बुद्रुक) व धामनखेल, मुळशी - निवे |
धुळे | धुळे - सोनगीर व खेडे, शिरपूर - आंबे व बोराडी |
नंदुरबार | नंदुरबार - घोटाणे, शहादा - प्रकाशा |
नाशिक | मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा), नाशिक - पळसे, सुरगणा - काठीपाडा, त्र्यंबकेश्वर - झारवड (खुर्द), येवला - बोकटे |
पालघर | मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा), नाशिक - पळसे, सुरगणा - काठीपाडा, त्र्यंबकेश्वर - झारवड (खुर्द), येवला - बोकटे |
रायगड | कर्जत - साळोख, रोहा - नागोठणे |
संबंध-प्र.द्वि.पु.ए.व. या व्याकरणिक विशेषांचे [-ल] हे पर्यायी रूप राज्यातील ९ जिल्ह्यांत आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक प्रसार आणि उदाहरण खाली दिले आहे :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
अमरावती | वरुड - गाडेगाव |
वाशिम | रिसोड - घोणसर |
बुलढाणा | बुलढाणा - पळसखेड भट व वरवंड, शेगाव - शिरजगाव (निळे) |
हिंगोली | हिंगोली - कारवाडी, कळमनूरी - मोरवड |
जालना | जालना - धावेडी |
औरंगाबाद | औरंगाबाद - पिंपळखुंटा |
बीड | बीड - बेडूकवाडी, शिरुर-कासार - टाकळवाडी |
अहमदनगर | अहमदनगर - कामरगाव व नारायण डोहो, नेवासा - मोरगव्हाण व खलालपिंपरी, जामखेड - जवळके, |
पुणे | जुन्नर - धामणखेल |
संबंध-प्र.द्वि.पु.ए.व. या व्याकरणिक विशेषांचे [-न-] हे पर्यायी रूप राज्यातील ६ जिल्ह्यांत आढळले. या पर्यायाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरण खाली दिले आहे :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
जळगाव | जळगाव - धामणगाव व वडली, रावेर - मांगलवाडी, चाळीसगाव - हातले व दहिवद, चोपडा - तांदळवाडी |
धुळे | धुळे - लळिंग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे |
नंदुरबार | नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा |
नाशिक | मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा), सुरगणा - काठीपाडा, सटाणा - दरेगाव |
पालघर | डहाणू - वेती (कातकरी) |
रायगड | कर्जत - साळोख (कातकरी), रोहा - चिंचवली (कातकरी), महाड - भेलोशी (कातकरी) |